साडे येथे १० लाख रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते संपन्न

साडे येथे १० लाख रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते संपन्न


करमाळा तालुक्यातील साडे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन युवा नेते दिग्विजय बागल यांच्या शुभ हस्ते झाले. या वेळी बोलताना म्हणाले की, पूर्व भागातील साडे हे गाव नेहमीच आमच्या विचाराने व विशेषतः लोकनेते स्व. दिगंबरराव बागल (डिगा) मामांच्या विचाराने काम करत आले आहे. या गावात जिल्हा नियोजन समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी ७.०० लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच गोमे वस्ती व हनुमंत आडेकर वस्ती येथे रस्ता मुरमीकरन करणे साठी ३.००., लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही आपण साडे गावांतील विविध विकास कामांचा पाठपुरावा करून विविध विकास कामांचे नियोजन करून जनहितार्थ कामे करण्यासाठी विशेष प्रयत्न करत राहीन असे सांगितले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच माणसाला एक वेळ विधानसभेत जाण्यासाठी आम्हाला एक वेळ संधी द्यावी असे आवाहन केले. यावेळी मकाई सह साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, मकाई चे संचालक सतीश नीळ,माजी सरपंच नवनाथ बदर भाऊराव माने शरद पाटूळे, दत्ता रोकडे, मधुकर रोकडे, बाळू गोतपल्ले, ज्येष्ठ नेते माजी सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, बाशांताराम शिंदे, संजय कांबळे, अभिजित खराडे, छगन हनवते, आकाश गायकवाड,ळू गोम दत्ता खराडे, अरुण गोमे, उत्रेश्वर चव्हाण, कुंडलिक चव्हाण, शरीफ कुरेशी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश