करमाळा येथे प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना निर्धार मेळावा संपन्न

करमाळा येथे प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना निर्धार मेळावा संपन्न 


करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे 


करमाळा येथे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला जिल्हा प्रमुख आरती बसवंती यांच्या उपस्थितीत शिवसेना निर्धार मेळावा विकी मंगल कार्यालय येथे पार पडला. सदर मेळाव्याचे आयोजन शिवसेना नेते कुणाल पाटील यांनी केलेले होते. त्याप्रसंगी सावंत यांनी कुणाल पाटील यांच्याबद्दल व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या दमदार कामाबद्दल कौतुक केले. यावेळी सावंत म्हणाले की, शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करून आगामी विधानसभेमध्ये करमाळयातून शिवसेनेचा आमदार होण्यासाठी सर्वांनी तन, मन धनाने कार्य करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जनसेवेचा वसा सर्वांनी आत्मसात करीत तळागाळापर्यंत पोहचून पक्ष वाढवावा. याकरिता काही अडचण असल्यास संपर्क प्रमुख या नात्याने मी आपल्यासोबत सदैव असेल अशी ग्वाही ही यावेळी सावंत यांनी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिक तसेच लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिली. 
तसेच आभार व्यक्त करताना शिवसेना नेते कुणाल पाटील म्हणाले की, सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली करमाळयातील शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी भक्कम पणे कार्य करीत आहे. तसेच आगामी विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज असून विजय आपलाच आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याणकारी योजनेचा लाभ सर्वांना मिळत असून शिंदे सरकारच्या कामगिरीवर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री यांच्या कार्याला प्रेरित होवूनच आज हजारोंच्या संख्येत महिला व पुरूषांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. तसेच लवकरच आपल्याला प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक पहायला मिळेल असे आम्ही कार्य करू असा विश्‍वास यावेळी कुणाल पाटील यांनी संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर यांना दिला. 
यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, उप तालुका प्रमुख लक्ष्मी  पोळ, उप तालुका प्रमुख दादासाहेब थोरात, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्रीकांत गोसावी, युवा सेना उप तालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, विशाल पाटील, मनोज रोकडे, युवा सेना उपतालुका प्रमुख विनोद शिंदे, उपशहर प्रमुख अनिकेत यादव, गणेश पवार, सहकार सेनेचे तालुका प्रमुख सुरज गोसावी, उपतालुका प्रमुख ज्योतीराम काळे, सहसचिव श्रीकृष्ण शिंदे, तुषार झाकणे, गणेश रायकर, शुभम गोसावी, सुमित पवार, अनमोल लोंढे, दत्ता ठोंबरे, नंदू पाटील, विशाल शिंदे, अशोक  पाटील, निलेश कांबळे, मेहरकर कोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश