केम तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अच्युत काका पाटील तर उपाध्यक्षपदी सचिन तळेकर
केम तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अच्युत काका पाटील तर उपाध्यक्षपदी सचिन तळेकर
करमाळा तालुक्यातील केम, येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदी, अच्युत काका पाटील,तर उपाध्यक्षपदी सचिन तळेकर, यांची निवड झाल्यामुळे,केम गावांमधून त्यांचे कौतुक होत आहे,केम ग्रामपंचायतची ग्रामसभा दिनांक 4 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात केम गावचे विद्यमान सरपंच सारिका कोरे,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,केम तंटामुक्ती समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्यामुळे,या निवडीनंतर बोलताना अच्युत काका पाटील म्हणाले की, आज केम ग्रामपंचायतीने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे,त्याला मी तडा जाऊ देणार नाही,गावातील तंटे मी प्रमाणिकपणे मिटवून, गावामध्ये शांतता ठेवण्यास प्रयत्न करेल,यासाठी केम गावातील नागरिकांनी मला साथ द्यावी,तसेच विविध प्रकरणात गरज लागेल तिथे पोलिसांना पण सहकार्य करणार आहे,या निवडीनंतर नूतन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अच्युत काका पाटील,व अध्यक्ष सचिन तळेकर यांचे केम परिसरातून अभिनंदन करण्यात आले आहे,
यावेळी उपस्थित
केम गावचे विद्यमान सरपंच सारिका कोरे,उपसरपंच अनवर मुलाणी,सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी,शिक्षक अधिकारी,व ग्रामस्थ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होती,