निमगाव हवेली विद्यमान सरपंच लखन अरुण जगताप यांचे पद जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडून रद्द करण्यात आले आहे
निमगाव हवेली विद्यमान सरपंच लखन अरुण जगताप यांचे पद जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडून रद्द करण्यात आले आहे.
करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथील ग्रामपंचायत सन 19/,2020मध्ये झालेली होती, त्यामध्ये मकाई सह साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांची पार्टी महुमताने विजयी झालेली होती परंतु लखन जगताप यांनी बागल गट सोडून सरपंच पद मिळविले होते, त्यानंतर सतीश नीळ यांनी लखन अरुण जगताप यांचे शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे त्यामुळे त्यास पदावरून दूर करावे अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर यांचे केली होती, त्यानुसार कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी श्री लखन जगताप याचे सदस्य पद रद्द केले आहे.
श्री सतीश नीळ यांच्या वतीने ॲड. घोडके यांनी तर जगताप यांच्या वतीने ॲड मराठे यांनी काम पाहिले आहे.