परभणीच्या घटनेत देशद्रोचा गुन्हा दाखल करा करमाळा येथे बसपा तर्फे तहसीलदारांना निवेदन.
परभणीच्या घटनेत देशद्रोचा गुन्हा दाखल करा करमाळा येथे बसपा तर्फे तहसीलदारांना निवेदन.
परभणी येथील घटनेतील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून या कृत्याच्या पाठीशी असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.या घटने विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार यांना बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले.
करमाळ्यातील बसपाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी तहसील कार्यालय करमाळा येथे एकत्र येऊन परभणीतील घटनेचा निषेध व्यक्त केला.त्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना दिलेल्या निवेदनात ॲड.महादेव कदम यांनी म्हटले आहे की परभणी येथील घटनेतील संशयित आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या कृत्याच्या पाठीशी असणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. तसेच गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलकांवरील ते गुन्हे मागे घेण्यात यावे यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य ॲड.महादेव कदम यांच्यासह संजय शिंदे लहू भालेराव, दारासिंह शिंदे पाटील,शांताराम कदम, रमेश भोसले,दशरथ गाडे, शिवाजी पोळ,ज्ञानदेव गायकवाड, दीपक गाडे,बबन कांबळे, अनिल जोगदंड,राम भोसले, बबन गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.