भांगे मालक यांचे निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपला : माजी आमदार जयवंतराव जगताप
भांगे मालक यांचे निधनाने पितृतुल्य मार्गदर्शक हरपला : जयवंतराव जगताप, माजी आमदार
शंकरराव भांगे मालक यांच्या निधनाचे वृत्त समजले ,मन अत्यंत व्यथित व दुःखी झाले .माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात शंकरराव भांगे यांचे स्थान पितृतुल्य मार्गदर्शकाचे होते .सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते देशभक्त नामदेवरावजी जगताप यांचे अत्यंत विश्वासू व निष्ठावान सहकारी म्हणून भांगे मालक संपूर्ण जिल्ह्यात परिचित होते .नामदेवराव जगताप यांनी शंकरराव भांगे यांना विद्या विकास मंडळ , करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी आदी शैक्षणिक संस्थांवर विश्वस्त पदी नेमले होते .राजकीय जीवनात त्यांनी प्रदीर्घ काळ करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहिले .माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या वेळी मार्केट कमिटी निवडणूक व विधानसभा निवडणूक प्रसंगी भांगे मालक यांनी मला अत्यंत मोलाची मदत केली .ईश्वर मृत आत्म्यास चिरशांती देवो व सद्गती लाभो हीच प्रार्थना , भांगे कुटुंबीयांचे दुःखात मी सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो . . .अशा शब्दात करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शंकरराव भांगे मालक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .