केम थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित: महावितरणकडून कारवाईचा बडगा
केम थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित: महावितरणकडून कारवाईचा बडगा
थकित वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या केम वीजग्राहकांवर कारवाईसाठी महावितरणने धडक मोहीम तीव्र केली आहे.
महावितरणतर्फे थकबाकीदारांना बिल भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तसेच थकबाकी भरण्याची मुदत संपल्यानंतर मोबाइलवरून वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस देण्यात येत आहे. त्यानंतरही बिल न भरल्यास थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.