करमाळा तालुक्यातील आ.संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... 36 गावाप्रमाणेच करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये तोच जोश आणि उत्साह... 2024 विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्यासाठी उमेदवारांचे गाव भेट दौरे सुरू आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांनी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला आणि 29 तारखेपासून करमाळा तालुक्यात गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली.मंगळवारी त्यांनी देवीचा माळ येथे दुपारी 2 वाजता प्रचाराचा नारळ फोडला. दिवसभरात त्यांनी देवीचा माळ , हिवरवाडी ,भोसे, वंजारवाडी, लिंबेवाडी व रायगाव या गावांना भेटी दिल्या. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे उत्साहात स्वागत केले. दिनांक 30 ऑक्टोबर बुधवार रोजी पांडे, मांगी, वडगाव उत्तर, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, बिटरगाव (श्री), कामोणे येथे कॉर्नर बैठका झाल्या. त्यानंतर सायंकाळी पोथरे येथे सभा झाली.या दौऱ्याला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी वाजतगाजत स्वा...