मा.आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडून राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी

मा.आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडून राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी 


 करमाळा तालुक्याचे विकास प्रिय माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी आज राजुरी येथे चालू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून माहिती घेतली. 
 विधानसभा निवडणुकीनंतर आज मा.आमदार संजय मामा शिंदे यांचा प्रथमच   जनता दरबार आहे. त्यानिमित्ताने ते तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. दरम्यान राजुरी गावाच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड असलेल्या राजुरी वीज उपकेंद्राला माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात मंजुरी मिळवली व त्याचे काम आज युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे राजुरीतील विजेची अत्यंत महत्त्वाची अडचण दूर होणार आहे.येत्या दोन महिन्यात हे वीज उपकेंद्र राजुरी करांच्या सेवेत खुले होणार आहे. 
 याशिवाय करमाळा माढा मतदारसंघाच्या ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेला राज्यातील सर्वाधिक लांबीचा हॅम या योजनेखाली मंजूर होऊन काम चालू असलेल्या सावडी ते वेणेगाव फाटा या रस्त्याच्या कामाची ही माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी पाहणी केली.
 71 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल 271 कोटी रुपयांचा निधी असून हा रस्ता दुपदरी सिमेंट काँक्रिटीकरण आहे. या रस्त्यामुळे सावडी, राजुरी,पोधवडी, अंजनडो,झरे,कुंभेज, कोंडेज,निंभोरे, मलवडी, व केम ही करमाळा तालुक्यातील 11 गावे तर उपळवटे, दहिवली, कनेरगाव व वेणेगाव ही माढा तालुक्यातील चार गावे अशी एकूण 15 गावे सोलापूर व पुणे या राष्ट्रीय महामार्गाला व नगर जिल्ह्याला जोडली जाणार आहेत. 
 यावेळी  तानाजी झोल,      नंदकुमार जगताप, महादेव आडसूळ,वैभव पाटील,संजय सारंगकर, सुनील पाटील, भाऊसाहेब जाधव, सुहास गरुड, उदय साखरे, आर. आर बापू साखरे, दादा बापू साखरे उपस्थित होते.

 राजुरी गाव उजनी बॅक वॉटर लगत असल्याने येथील विजेची समस्या मोठी होती. आदरणीय मामांनी आमची ही समस्या सोडवली असून त्याचा फार मोठा फायदा राजुरीच्या विकासाला होणार आहे. 
 नंदकुमार जगताप राजुरी 
 राजुरी येथील विज उपकेंद्र, हॅम रस्ता, सरकारी दवाखाना, पूल,व्यायामशाळा, पंतप्रधान ग्रामसडक योजना यासारखे असंख्य कामे मामांच्या कार्यकाळात मार्गी लागली* 
 आर. आर. बापू साखरे, राजुरी 
 *सावडी ते वेणेगाव फाटा या 71 किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे करमाळा तालुक्याच्या ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे 
 भाऊसाहेब शेळके. सरपंच, सावडी

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

उमरड येथील ओढ्यावर पूल बांधण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी सिमेंटच्या नळ्या उमरड येथील ओढ्यावर पोहोच केल्या ग्रामस्थांमध्ये आनंद

कुगाव बोट दुर्घटना ....प्रशासनाशी समन्वय ठेवून आहे...आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा तालुक्यातील आ.संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...