आदिनाथ सह प्रत्येक निवडणुक लढण्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचा असणार ॲक्शन प्लॅन


 आदिनाथ सह प्रत्येक निवडणुक लढण्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचा असणार ॲक्शन प्लॅन


 करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे 
          
विधानसभा निवडणुकीनंतर करमाळ्याचे राजकारणातील महत्वाचा असणारा माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा गट आणि गटातील प्रमुख संजयमामा शिंदे हे शुक्रवारी जनता दरबाराच्या निमित्ताने विठ्ठल निवास येथे हजर होते.  नेहमी प्रमाणेच या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी दिसुन आली.  सकाळ पासुन राजुरी, कोर्टी भागातील विविध विकासकामांचे संदर्भात चालु असलेल्या कामांचा आढावा घेत संजयमामांनी दुपारी जनता दरबाराला सुरुवात केली.  या ठिकाणी कार्यालयात देखिल कार्यकर्त्यांची गर्दी दिसुन येत होती.  आता पुढील काळात संजयमामा करमाळ्यात फिरकणार नाहीत अशी दिवास्वप्ने पाहणाऱ्यांना ही मोठी चपराक ठरली असुन, संजयमामा पुन्हा ॲक्शनमोड वर आल्यामुळे करमाळ्याच्या पुढील राजकीय वातावरणात शिंदे गट सज्ज होवुन आदिनाथसह प्रत्येक निवडणुकीत पुर्ण ताकदीने सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट संकेत या निमित्ताने मिळत आहेत
            प्रत्येक निवडणुकीचा ॲक्शन प्लॅन तयार होत असुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सह मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे देखिल पाठबळ लाभत आहे.  महायुती सरकारचे काळात माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यात तब्बल ३४९० कोटींची विकासकामे मंजुर करून आणलेली असुन त्यापैकी काही कामे प्रगतीपथावर आहेत.  किमान २ वर्ष ती कामे पूर्ण व्हायला वेळ लागेल एवढी मोठी कामे मामांनी मंजूर केलेली आहे.  या विकासकामांसह पुढील काळात अनेक प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा माजी आमदार संजयमामा शिंदे प्लॅन सह ॲक्शन मोडवर आले असुन यामुळे माजी आमदार शिंदे यांचे गटातील कार्यकर्त्यामधे नवचैतन्य निर्माण झाले आहे.  त्यामुळे भविष्यकाळात होणाऱ्या निवडणुकात देखिल माजी आमदार संजयमामा शिंदे गट सक्रीय झालेला दिसुन येणार आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश