करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला ; 10 मार्च ते 19 एप्रिलपर्यत निवडणूक प्रक्रिया चालणार आहे
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला ; 10 मार्च ते 19 एप्रिलपर्यत निवडणूक प्रक्रिया चालणार आहे
17 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी मतदान घेण्यात येणार असून 19 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे व मतमोजणीनंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे
10 मार्च ते 17 मार्चपर्यत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे
19 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत
सदरच्या कारखान्यात व्यक्ती उत्पादक सभासद जेऊर,सालसे, पोमलवाडी,केम,रावगाव, गटांमध्ये प्रत्येकी 3 असे 15 सदस्य तर उत्पादक सहकारी संस्था,अनुसूचित जाती जमाती, इतर मागास व भटक्या जाती जमाती यामध्ये प्रत्येकी 1 तसेच राखीव महिला 2 सदस्य अशा एकूण 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे