आमदार नारायण आबा पाटील जेऊर गटातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल धुळाभाऊ कोकरे
आमदार नारायण आबा पाटील जेऊर गटातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल धुळाभाऊ कोकरे
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रगतशील बागायतदार धुळा भाऊ कोकरे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासद व शेतकरी हितासाठी जेऊर गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धुळा भाऊ कोकरे हे कुगाव येथील प्रगतशील बागायतदार असून गेली पंधरा ते वीस वर्षापासून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी शेतकरी सभासद यांचे हीच जपण्याचे काम केले आहे. नारायण आबा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. नारायण आबा पाटील गटाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी दाखल केला असून शेतकरी सभासद यांच्या कल्याणासाठी व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला गत वैभव मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे प्रगतशील बागायतदार आदिनाथ चे ज्येष्ठ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे यांनी सांगितले आहे