वाहनधारकाच्या नंबर प्लेटच्या नावाखाली होणाऱ्या लुटीसाठी परिवहन अधिकारी यांचा मनमारी कारभार थांबवण्यासाठी सोलापूर प्रहार संघटना आक्रमक...?
.देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ?
वाहनांच्या नंबर प्लेटच्या नावाखाली नागरिकांची होणारी लूट थांबवणे बाबत..?
वरील विषयास अनुसरून HSRP वाहनांचा नंबर प्लेटच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये वाहनधारकांची लूट करण्यात येत आहे. 2019 च्या पूर्वी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे अशी आठ घालण्यात आलेली आहे त्याची मुदत 30 एप्रिल पर्यंत ची देण्यात आली असून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील वाहनांना तीन पट जास्त दर घेण्यात येणार असून काही दिवसापूर्वी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळचा विस्तार होण्या अगोदर परिवहन अधिकाऱ्यांनी हा मनमानी कारभार केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.कारण टेंडर धारकांना 500 ते 600 कोटी रुपयांचे टेंडर देण्यात आले आहे.असे असताना इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात तीन पट जास्त दर आकारण्यात येणार आहेत ही सामान्य जनतेची फसवणूक आहे. या साठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती त्यांचे म्हणणे आहे की सर्वात कमी दरामध्ये टेंडर काढण्यात आले आहे. इतर राज्यात उदा :- गोवा 155 गुजरात 160 आंध्र प्रदेश 245 मात्र महाराष्ट्रामध्ये 450 चा दर का? व gst 18% याचे कारण या परिवहन अधिकाऱ्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला आहे हे सर्व उघड दिसत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी तीन कंपन्यांना बेकायदा टेंडर कंत्राट दिलेले आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा 600 कोटीचे टेंडर जवळजवळ दीड हजार कोटी रुपये मिळणार आहेत याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे कारण इतर राज्याप्रमाणे 155 ते 160 कमीत कमी दर आकारावे ही विनंती अन्यथा आठ दिवसानंतर आदरणीय माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत अचानक पणे आंदोलन केले जाईल त्यावेळी होणाऱ्या परिस्थिती सर्वस्वी प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील. याची नोंद घ्यावी