मा. राम शिंदे सभापती,विधानपरिषद. जेऊर रेल्वे स्थानकावर " हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस" या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत निवेदन दिले
मा. राम शिंदे सभापती,विधानपरिषद.
जेऊर रेल्वे स्थानकावर " हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस" या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत निवेदन दिले
जेऊर हे करमाळा, जामखेड, इंदापूर परांडा, भूम, कर्जत या तालुक्यांना संलग्न व दाट संपर्क असणारे मध्ये रेल्वेवरील स्थानक असून जवळजवळ 50-60 गावे जोडली गेलेली आहेत, या गावातील हजारो प्रवाशी रेल्वेने सतत येत जात असतात, दवाखाना, कोर्ट कचेरीची कामे, शाळा, कॉलेज, खरेदीसाठी, चाकरमानी यांना जावे लागते. यामुळे रेल्वे स्टेशन सतत गजबजलेले असते.
सोलापूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, या ठिकाणी येण्या जाण्यासाठी खालील गाड्यांचे थांबे मिळणे आवश्यक आहे. थांबा मिळाल्यास प्रवाशांची गैरसोय तर थांबेलच पण रेल्वेचे ही उत्पन्न वाढेल.
जेऊर रेल्वे स्थानकावर थांबत असलेल्या इंद्रायणी इंटरसिटी या गाडीची पुण्याच्या दिशेने जाताना रिझर्वेशन तिकीट विक्री दौंड जंक्शन पेक्षा 6 पटीने जास्त आहे, तसेच जेऊर स्थानकावरून पुण्याच्या दिशेने जाणारे व पुण्यातून जेऊर स्थानकावरून उतरणारे इंद्रायणी सुपरफास्ट या गाडीला रिझर्वेशन करून चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची दररोजची सरासरी संख्या 42 आहे याच्यावरून असे लक्षात येते की जेऊर पुणे जेऊर मुंबई जाणाऱ्या प्रवाशांची संख्या इंद्रायणी इंटरसिटी गाडीला फार मोठ्या प्रमाणात आहे याच धरतीवर सकाळच्या " हुतात्मा इंटरसिटीला" जेऊर येथे येताना व जाताना थांबा देण्यात यावा. जेऊर रेल्वे स्थानकाचे प्रवासी तिकीट विक्रीतून सरासरी दिवसाचे उत्पन्न 1,00000/-रुपये आहे.
पुढील गाड्यांचे थांबे देण्यात यावे.
(12157 - 12158) हुतात्मा एक्सप्रेस.
(11301-11302) उद्यान एक्सप्रेस.
(17613) पनवेल नांदेड एक्सप्रेस.
जेऊर हे सोलापूर जिल्हा, डीविजन, तसेच ग्रामीण भागातील सर्वात जास्त उत्पन्न देणारे रेल्वेस्टेशन आहे. आहे तरी थांबा दिल्यास रेल्वे प्रशासन व सोलापूर डिव्हिजनच्या उत्पन्नात वाढ होईल व सर्वात महत्त्वाचे प्रवाशांची सोय होईल.
वरील सर्व बाबींचा सकारात्मक विचार करावा अशी आपणास व रेल्वे प्रशासनास प्रवाशांकडून व नागरिकांकडून नम्र विनंती आहे.
जेऊर स्थानकावर या गाड्यांना थांबा मिळावा म्हणून 1500 - 2000 प्रवाशी नागरिकांनी मोर्चा देखील काढला होता, व 57 गावांचे ग्रामपंचायतचे ठराव व आजी माजी आमदार व विविध संघटना यांचे पत्र रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत.
जेऊर रेल्वे स्थानकातून दररोज 1500 - 2000 प्रवासी प्रवास करतात.
मध्य रेल्वेचे स्पीड वाढवण्यात आले असून आता रेल्वे 130 च्या स्पीडने चालतात त्यामुळे पूर्वीपेक्षा रेल्वे बिफोर चालत आहेत, त्यामुळे गाड्या नियोजित वेळेच्या अगोदरच येऊन दौंड, सोलापूर आणि पुणे आऊटर स्टेशनला जाऊन विनाकारण बराच वेळ थांबतात त्यामुळे या गाड्यांना जेऊर स्थानकावर थांबा दिल्यास शासनाच्या व प्रवाशांच्या दोघांच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.