उजनी धरण डिसकळ पुलाची अवस्था बेकार, भिगवण ते करमाळा मार्गावर धोकादायक प्रवास
उजनी धरण डिसकळ पुलाची अवस्था बेकार, भिगवण ते करमाळा मार्गावर धोकादायक प्रवास
करमाळा: उजनी धरणाच्या बॅकवॉटरवरील डिसकळ पूल अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत आहे. या पुलावरून भिगवण आणि करमाळा तालुक्यादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. पुलाच्या कडे गेले आहेत काही भागातील . त्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे अधिक धोकादायक झाले आहे. तुटलेल्या भागामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली आहे, परंतु अद्याप यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
इंदापूर आणि करमाळा या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असून, याच्या दुरवस्थेकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल.