ढोकरी येथे विद्युत उपकेंद्र उभारणी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजी बंडगर

ढोकरी येथे विद्युत उपकेंद्र उभारणी  लवकरच सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजी बंडगर यांनी दिली. 

वांगी नं 1 येथील विध्युत उपकेंद्रातून  वांगी नं 1, 3,4,ढोकरी ,भिवरवाडी ,बिटरगाव वां , नरसोबावाडी आदि गावांना , शेतीला विद्युत पुरवठा केला जातो.  त्यामुळे वांगी नं 1 येथील उपकेंद्रावर मोठा लोड असतो . त्यामुळे सतत लोडशेडिंग, आठ आठ तासाच्या भारनियमनास या गावांना तोंड ध्यावे लागते. यावर उपाय म्हणून ढोकरी ग्रामस्थांनी त्यांच्या गावात असलेली खुली जागा सूचविली.  तसा ठराव करून महावितरण ला दिला. परंतु उपकेंद्राच्या उभारणी कामी शासनाच्या महसूल ,वन ,सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा अशा अनेक विभागाच्या नाहकती लागतात. यापैकी वनविभागाच्या जाचक नियमामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाहीत मिळणं अवघड झाले होते. मात्र याचा अथक पाठपुरावा प्रा.शिवाजी बंडगर यांनी केला. 

वनविभागाला उपकेंद्राची उपयोगिता ,गरज ,उजनी धरणग्रस्तांच्या त्यागाची कल्पना देवून नाहरकत कशी आणि किती गरजेची आहे पटवून दिले. पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यानाही  लेखी पत्र दिले . 

 अखेर आज दि. 26 रोजी वनविभागाने नाहरकत पत्र दिले आहे. 

 या वर बोलताना प्रा. बंडगर म्हणाले की , ढोकरी येथे सबस्टेशन कार्यान्वित झाल्यास याचा फायदा ढोकरी, भिवरवाडी ,बिटरगाव वां ,वागी 4  आदी गावांना होणार असून वनविभागाची मुख्य अडचण दूर करण्यासाठी खूप पाठपुरावा लागला. नाहरकत मिळाल्याने आनंद असून लवकरच सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा , यांच्या नाहरकती मिळवून भूमिअभिलेख कार्यालय मोजणी करून देईल आणि उभारणी लवकरच होईल.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश