करमाळा पोलिसांची कारवाई देशी विदेशी दारू व आरोपीसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त
करमाळा पोलिसांची कारवाई देशी विदेशी दारू व आरोपीसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त
करमाळा पोलिसांनी पुन्हा एकदा जबरदस्त कारवाई करत देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करून करमाळा पोलिसांनी अवैध देशी-विदेशी दारु वाहतुक करणारे इसमावर कारवाई करुन एकाला जेरबंद केले आहे.
सदाशिव अजय मराठे (वय २८) रा. निमगाव (टें), ता. माढा, जि. सोलापूर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून ४७ हजार रुपयांची दारु व एक महिंद्रा बोलेरो गाडी असा एकुण ५ लाख ४७ हजार १४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची हकीकत अशी ही करमाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना खबर्यामार्फत अवैध रित्या देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे करमाळा पोलिसांनी केम ते वडशिवणे रोडवर सापळा रचला .
हवालदार अलिम मलिक शेख, अमोल घुगे व प्रविण चव्हाण हे मौजे केम गावचे हद्दीतील वेताळबाबा मंदीराजवळ सापळा लावला. यावेळी त्यांना त्या दिशेने येत असलेली एक चारचाकी महिंद्रा बोलेरो गाडी तीचा त्यांना संशय आल्याने अडवली .त्या गाडीची तपासणी केली असता त्यात अवैध देशी-विदेशी दारूचे बॉक्स असल्याचे लक्षात आले. त्या सर्वांची एकूण तपासणी केली असता एकुण ४७ हजार १४ रु. किंमतीचे देशी-विदेशी दारुचे बॉक्स व त्यामध्ये देशी-विदेशी दारुच्या बाटल्या मिळुन आल्या. यावेळी सदर गाडीचे चालक सदाशिव मराठे (वय २८) यास ताब्यात घेतले.तसेच त्याच्याकडून अंदाजे ५ लाख रु. किंमतीची एक महिंद्रा बोलेरो गाडी क्र. एम.एच.-४५/ए.क्यु.-४७५९ असा एकुण ५ लाख ४७ हजार १४ रु. किंमतीचा मुद्देमाल कारवाईसाठी ताब्यात घेवुन त्याचेवर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रणजीत माने, हवालदार अलिम मलिक शेख, पो.शि. अमोल घुगे , पो.शि. प्रविण चव्हाण आदीच्या पथकाने केली आहे. याचा तपास हवालदार अलीम शेख हे करीत आहेत.