शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती व शेतीमध्ये जलतारा प्रकल्प करणे काळाची गरज करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे प्रतिपादन.

विकसित गाव अभियानांतर्गत गाव भेट दौरा
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती व शेतीमध्ये जलतारा प्रकल्प करणे काळाची गरज करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे प्रतिपादन. 
      सध्याच्या काळात सर्वच शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची टंचाई होत आहे त्यामुळे भूजल पातळी वाढवण्यासाठी शेतीमध्ये जलतारा प्रकल्प तयार करावेत असे मत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मांडले. 
    सरपडोह (तालुका करमाळा) येथे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून मिशन विकसित गाव अभियान या प्रकल्पांतर्गत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर येथील एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांच्या गाव भेट अभ्यास दौऱ्यानिमित्त त्यांनी सरपडोह येथे भेट दिली असता ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येक शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी आपल्या शेतामध्ये थांबवण्यासाठी जलतारा प्रकल्प करावेत त्यामुळे गावाची भूजल पातळी वाढेल तसेच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे कारण मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्व खूप मोठे आहे ,सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचे सुपीकता टिकून राहते, जैवविविधता वाढते शेती करण्याचा खर्च कमी होतो. शेतकऱ्यांना या पुढील काळात वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. गावातील ग्रामपंचायत मधील एवढे सर्व पुरस्कार पाहता तुमचे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये जलतारा प्रकल्प करणारे पहिले गाव नक्की ठरेल असे मला वाटते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. 
यावेळी उपसरपंच नाथराव रंदवे सर यांनी मान्यवरांचे स्वागत करून गावातील विकास योजना विषयी माहिती व जलतारा प्रकल्प प्रभावी अमलबजावण्यासाठी ग्रामसभेत ठराव संमत केल्याचे सांगितले तसेच प्राध्यापक राख सर सोलापूर जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना अधिक दोन स्तर, एम एस डब्ल्यू चे विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच पांडुरंग वाळके, उपसरपंच नाथराव रंदवे ,अरुण चौगुले सर पोलीस पाटील संघटनेचे संदीप पाटील गाव पोलीस पाटील अंकुश खरात सोसायटी चेअरमन लक्ष्मण खराडे ग्रामपंचायत सदस्य बाळू गवारे दत्ता मोरे तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ भिताडे,मनोहर रंदवे, अजय घोगरे ,अनिल आरणे ,रोहित बोंद्रे , नागनाथ काळे, कालिदास काळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स चे विद्यार्थी तसेच पुरुष व महीला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक उपसरपंच यांनी केले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश