बाजार समितीमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा माजी आमदार जगताप यांच्या हस्ते शुभारंभ होणार उपसभापती सौ शैलजा मेहेर
बाजार समितीमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा माजी आमदार जगताप यांच्या हस्ते शुभारंभ होणार उपसभापती सौ शैलजा मेहेर
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाळा येथील मुख्य बाजारातील पूर्व यार्ड मधील रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार दि ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती बाजार समितीच्या उपसभापती सौ शैलजा बबन मेहेर यांनी दिली .यावेळी सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक अनिकेत शिंदे प्रमुख अतिथी म्हणून तसेच बाजार समितीचे सर्व संचालक ,व्यापारी ,हमाल -तोलार उपस्थित राहणार आहेत.माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पायाभूत सुविधा व विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीतील सर्व अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला व सदर कामास पणन संचालक यांची मान्यता घेतली असून याकामी पणन संचालक विकास रसाळ,जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड , सहाय्यक निबंधक कार्यालय यांचे सहकार्य मिळाल्याचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी सांगितले .