करमाळा बाजार समितीत रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे स्वनिधीतून,सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध :माजी आमदार जगताप

करमाळा बाजार समितीत रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे स्वनिधीतून,सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध :माजी आमदार जगताप यांची ग्वाही 


करमाळा बाजार समितीने रस्ते कॉंक्रिटीकरणाची  कामे बँका अथवा कृषी पणन  मंडळाकडून कर्ज न घेता स्वनिधीतून हाती घेतली असूनआगामी काळात शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा देण्याकरीता कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली .करमाळा बाजार समितीच्या पूर्व यार्ड मधील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ माजी आमदार जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते . यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अनिकेत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी बोलताना माजी आ .जगताप यांनी सांगितले की,करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता कै . नामदेवराव जगताप व कै .अण्णासाहेब जगताप यांनी करमाळा बाजार समितीची स्थापना केली .मी१९८९ साली बाजार समितीची सूत्रे हाती घेतली त्यावेळी बाजार समितीचे उत्पन्न अवघे १८ लाख रुपये होते .त्यावेळी शेतकरी व्यापाऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी उत्पन्न वाढ गरजेची होती, त्याकरिता मी मोठ्या प्रमाणावर शॉपिंग कॉम्प्लेक्स व गोदामांची उभारणी केली .यातून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली .तसेच स्वच्छ व पारदर्शी कारभारावर लक्ष केंद्रित केले त्याच्या दृष्य परिणामातून आज बाजार समितीचे उत्पन्न ३ कोटीच्या घरात आहे . त्यामुळे आम्हाला बँका अथवा वित्तीय संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता स्वनिधीतून मूलभूत सुविधांसाठी विकास कामे करणे शक्य झाले आहे . पदाधिकारी ,शेतकरी ,व्यापारी, हमाल- तोलार यांच्या समन्वयातून एक विश्वसनीय बाजारपेठ असं नावलौकिक झाल्यामुळे करमाळा बाजार समितीत फक्त करमाळा तालुक्यातील नव्हे तर आसपासच्या तालुक्यातून व जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीस येतो .आगामी काळात उर्वरित भागातील रस्ते कॉंक्रिटीकरण,जनावरांचा बाजार सुरू करणे यासह शेतकरी हिताच्या दृष्टीने विकास कामे हाती घेणार असल्याची माहिती देखील माजी आमदार जगताप यांनी यावेळी बोलताना दिली .यावेळी गट सचिवांचे नेते बबनराव मेहेर,श्रेणिकशेठ खाटेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत ,बाजार समितीचे संचालक जनार्धन नलवडे,सागर दौंड ,तात्यासाहेब शिंदे ,नागनाथ लकडे ,महादेव कामटे, वालचंद रोडगे, रामदास गुंडगिरे,शिवाजी राखुंडे ,बाळासाहेब देवकर ,परेश दोशी व्यापारी विक्रांत मंडलेचा मयूर दोशी ,विजयकुमार दोशी,सुनील मेहता, अनुप दोशी ,अनिल सोळंकी ,प्रीतम लुंकड,नवनाथ सोरटे,संतोष गुगळे, तोलार संतोष कुकडे ,प्रमोद गायकवाड ,संजय गायकवाड ,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष महादेव डुबल, संचालक दादासाहेब लबडे, शहाजी शिंगटे,जिल्हा बँकेचे अधिकारीअभयसिंह आवटे ,गट सचिव अनिल सुरवसे,लक्ष्मण थोरात,दादासाहेब पुजारी,दादासाहेब सरडे,आनंद शिंदे,ॲड नवनाथ राखुंडे,विकास आमृळे,अमोल परदेशी ,झनकसिंग परदेशी,ज्योतीराम ढाणे,अशोक नरसाळे यांचे सह शेतकरी ,व्यापारी, हमाल - तोलार, गाळेधारक ,जिल्हा बँक अधिकारी व कर्मचारी,गट सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक युसुफ शेख यांनी केले .उपस्थितांचे स्वागत संतोष गुगळे ,सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी केले तर आभार  दत्तात्रय शिर्के यांनी मानले .

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश