प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत गणेश चिवटे यांचे पालकमंत्र्यांना निवेद

प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत गणेश चिवटे यांचे पालकमंत्र्यांना निवेद 

करमाळा - माढा प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले आहे.गेली अनेक दिवसांपासून करमाळा कुर्डूवाडी विभागांमध्ये प्रांताधिकारी नियुक्त नसल्याची बाब गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून दिली.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की करमाळा कुर्डूवाडी विभागांमध्ये अनेक दिवसांपासून प्रांताधिकारी नियुक्त नाही.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही यां मागणीची लागलीच दखल घेऊन लवकरच माढा उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती होईल असे सांगितले आहे अशी माहिती गणेश चिवटे यांनी दिली आहे.करमाळा व माढा तालुक्यातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे शासकीय दाखले काढण्यासाठी विलंब होत आहे.शेतकरी व इतर नागरिकांना प्रांताधिकारी नसल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे गणेश चिवटे यांनी ही मागणी महत्वपूर्ण करून या विषयाला वाचा फोडल्याबद्दल नागरिकांमध्ये चिवटे यांचे कौतुक होत आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश