शेलगाव ते ढोकरी रस्त्याचे खड्डे बुजवणे सुरू झाले शुभम बंडगर यांच्या प्रयत्नाला आली यश
शेलगाव ते ढोकरी या 14 कि मी रस्त्याच्या विशेष दुरूस्तीची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागील पंधरवड्यात भाजप युवा मोर्चा करमाळा तालुका अध्यक्ष शुभम शिवाजीराव बंडगर यांनी केली होती . त्यावेळेस पालकमंत्री ना.गोरे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधिक्षक अभियंता परदेशी यांना तात्काळ काम चालू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या नुसार आज पहिल्याटप्प्यात 14 किमी अंतरात ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत किंवा रस्ता खराब झाला आहे त्या त्या ठिकाण चे दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
वांगी परिसरातील रस्ता संघर्ष समितीने प्रयत्न करून गतवर्षी मे 2024 मधे या रस्त्याचे विशेष दुरूस्ती अंतर्गत पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत काम मंजूर करून ह भ प रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते काम सुरूही केले होते. परंतु तीन ते चार किमी अंतरात कार्पेट केल्यानंतर अचानक काम बंद करण्यात आले.
तेव्हापासून आतापर्यंत रस्ता संघर्ष समिती च्या माध्यमातून पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयाकडे सतत पाठपुरावा चालू असतानाच भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम शिवाजीराव बंडगर यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे याची कैफियत मांडली .....अन आज यश येताना दिसत आहे . यामुळे शुभम बंडगर यांचे अभिनंदन केले जात आहे.
चौकट -
शेलगाव ते ढोकरी या रस्त्याची दुरवस्था होवू लागली आहे. रस्ता संघर्ष समितीने पाठपुरावा करताना मला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून तात्काळ याची सोडवणूक करण्याची सूचना करण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातले. आणि आज पहिल्या टप्प्यात खड्डे बुजवून घेण्यात येत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मी आभार मानतो.
शुभम बंडगर
शेलगाव ते ढोकरी या रस्त्याची दुरवस्था होत असल्याबाबत रस्ता संघर्ष समितीने आम्हास अवगत केले होते . मागील पंधरवड्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फोन करून अधिक्षक अभियंता परदेशी साहेब याना ही अडचण तात्काळ सोडण्यात सांगितले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात खड्डे बुजवून घेत आहोत. दुसर्या टप्प्यात कार्पेट चे काम करण्यात येणार आहे.
विलास ढेरे
कार्यकारी अभियंता ,
पंतप्रधान ग्रामसडक योजना ,
सोलापूर