वाढदिवसाचा खर्च टाळत पाथुर्डी येथील नागनाथ दरगुडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
वाढदिवसाचा खर्च टाळत पाथुर्डी येथील नागनाथ दरगुडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील जय मल्हार दूध डेअरीचे चेअरमन नागनाथ दरगुडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाथुर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
पाथुर्डी येथील नागनाथ दरगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 77 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी Tv 9 मराठीचे पत्रकार शितलकुमार मोटे, सरपंच सदाशिव तोडेकर,उपसरपंच प्रकाश खरात, ग्रामपंचायत सदस्य सचिन चांगण,खंडू नाळे, अतुल मोटे, लक्ष्मण दरगुडे,शंकर तोडेकर,सोपान दरगुडे,तानाजी कोरे,गोविंद खरात,सुरेश खरात,मुख्याध्यापक महेश्वर कांबळे,उपशिक्षिका सुरेखा चौरे,कविता कांबळे,उपशिक्षक अक्षय दळवी,अरुण गोंदे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.