वीट गावचे सुपुत्र रणजीत निंबाळकर यांचा भव्य सत्कार; कृषी तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल पंधरा लाख पुरस्कार प्रदानकेंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रणजीत निंबाळकर यांना पंधरा लाख बक्षीस

वीट गावचे सुपुत्र रणजीत निंबाळकर यांनी १६ देशांमध्ये गाजवले नाव!


वीट,  करमाळा तालुक्यातील वीट गावचे सुपुत्र रणजीत निंबाळकर यांनी आपल्या  हरिहर ॲग्रोटेक कृषी तंत्रज्ञानाने केवळ वीट गावचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर रोशन केले आहे. तब्बल १६ देशांमध्ये त्यांच्या मानवचलित व ट्रॅक्टरचलित कृषी अवजारांच्या तंत्रज्ञानाने दुसरा क्रमांक पटकावून त्यांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
रणजीत निंबाळकर हे वीट गावचेच रहिवासी असून, त्यांची ओळख केवळ एक तंत्रज्ञ म्हणून नाही, तर एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकरी हितासाठी झटणारा व्यक्ती म्हणूनही आहे. शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत आणि त्यांना योग्य पद्धतीने शेती करता यावी, या तळमळीतून त्यांनी अनेक वर्षे संशोधन करून ही अवजारे विकसित केली आहेत. त्यांच्या या दूरदृष्टी आणि प्रयत्नांचे फळ आज त्यांना मिळाले आहे.
त्यांच्या या तंत्रज्ञानाचे १६ देशांनी कौतुक केले असून, यामुळे भारतीय हरिहर ॲग्रोटेक कृषी क्षेत्रातील नवनवीन संशोधनांना जागतिक मान्यता मिळाली आहे. रणजीत निंबाळकर यांच्या या यशामुळे वीट गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे, तर करमाळा तालुक्यालाही त्यांचा प्रचंड अभिमान वाटत आहे. त्यांच्या या कार्यामुळे राज्यातील इतर तरुण संशोधकांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश