जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कावळेवाडी जि. प. शाळेत वह्या वाटप!
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते व जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील
यांच्या वाढदिवसानिमित्त कावळवाडी,ता.करमाळा येथे जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.भैय्यासाहेब यांचा वाढदिवस मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला गेला रक्तदान शिबीर,शालेय वह्या-पुस्तक,वृक्षारोपण अशी कित्तेक समाज उपयोगी कार्यक्रम करण्यात आले.