करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात असून, नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
आमदार मोहिते-पाटील यांच्या दौऱ्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात आज आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कारखान्याच्या वाहतूक व्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आमदार नारायण पाटील यांनी वाहन मालकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. बैठकीत वाहन मालकांनी त्यांच्या मागण्या व अपेक्षा आमदारांसमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक दरात सुधारणा, वेळेवर बिले मिळणे आणि इतर सोयीसुविधांविषयी चर्चा झाली. यावेळी बोलताना आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, "वाहन मालक हे कारखान्याच्या कामकाजाचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या हिताचे जतन करणे आमचे कर्तव्य आहे. " बैठकीस मोठ्या संख्येने वाहन मालक उपस्थित होते. त्यांनी आमदार पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. या बैठकीमुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना आ...
आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने करमाळा आदिनाथ सह. साखर कारखान्याची उमेदवार अर्जाची छाननी प्रक्रीया घेण्यात आली. ऊस उत्पादनाची सलग तीन वर्षाची अट रद्द झाल्याने बहुतांशी सर्वच अर्ज वैध ठरविण्यात आले. ऊस उत्पादक मतदार संघासह, महिला राखिव, अनु जाती, भटक्या जमाती मतदार संघात कोणीही हरकती दाखल केलेल्या नाहीत मात्र सहकारी संस्था मतदार संघात माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे उमेदवार सुजित बागल व शारदा मोरे यांच्या अर्जावर आमदार नारायण पाटील गटाचे वतीने हरकत घेण्यात आली होती. यावर दोन्ही बाजुकडून विधिज्ञ नेमण्यात आले होते. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकुन.. निवडणुक निर्णय अधिकारी श्री अमोलसिंह भोसले यांनी सायंकाळी उशिराने निर्णय पारित केला असुन यामधे हरकती फेटाळत श्री सुजित शिवाजी बागल व सौ शारदा मोरे यांचे दोन्ही अर्ज मंजुर केले आहेत. याबाबत उमेदवार श्री सुजित बागल यांचेशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आदिनाथ साखर कारखाना हा फक्त माजी आमदार संजयमामांच्या नेतृत्वातच चांगला चालु शकतो. आमदारांनी आमचेवर चुकीची ...
आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश वडशिवणे, शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे! वडशिवणे तलावात पाणी सोडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अजित तळेकर यांनी केलेल्या अथक पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या निष्ठेमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वडशिवणे तलावात पाणी सोडण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लाट उसळली आहे. गेली अनेक वर्षे वडशिवणे तलावातील अपुऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेती सिंचनाखाली येत नव्हती. यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत होता, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होत होता. ही गंभीर समस्या ओळखून अजित तळेकर यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी या प्रश्नाची गांभीर्यता आमदार नारायण पाटील यांच्या निदर्शनास आणली. वारंवार भेटीगाठी, आणि फोन करून त्यांनी आमदार महोदयांकडे तलावात पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली. त्यांच्या या अदम्य पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेतली आणि त्याला...