मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केम येथे रक्तदान शिबिर;करमाळा तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ यांचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केम येथे रक्तदान शिबिर;करमाळा तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष  सचिन पिसाळ यांचे आवाहन


करमाळा: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा तालुका भाजपचे       करमाळा तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष  सचिन पिसाळ यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले सामाजिक कर्तव्य बजावावे, असे आवाहन पिसाळ यांनी केले आहे.
हे रक्तदान शिबिर केम येथे आयोजित करण्यात आले असून, रक्तदात्यांच्या सोयीसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन रक्तदान करावे आणि इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन भाजप  करमाळा तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष  सचिन पिसाळ यांनी केले आहे ठिकाण केम विठ्ठल मंदिर 22/7/2025.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश