शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते शिवसेनेच्या चार शाखांचे उद्घाटन
शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते शिवसेनेच्या चार शाखांचे उद्घाटन
करमाळा तालुक्यात चिखलठाण परिसरातील शिवसेनेच्या चार शाखांचे उद्घाटन शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तिथे शाखा सुरू करण्यात येणार असून याद्वारे लोकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन चिखलठाण येथील मुख्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे होते. पुढे
बोलताना बागल म्हणाले की, आम्ही केवळ निवडणुकांपुरते लोकांच्या दारात जात नाही तर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात कायम त्यांच्यासोबत असतो. करमाळा तालुक्यातील विविध अडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील असून येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीनिशी लढवल्या जातील असेही यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या हस्ते या परिसरातील केडगाव, कुगाव, चिखलठाण नंबर दोन व चिखलठाण
नंबर एक येथील चार शाखांचे उद्घाटन करण्यात आले. चिखलठाण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील सभागृहात झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र सरडे यांनी केले. यावेळी मकाई कारखान्याचे संचालक दिनकर सरडे, केरू गव्हाणे यांची भाषणे झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत चिखलठाणचे उपसरपंच अक्षय सरडे, राहुल गोळे, समाधान गव्हाणे, शशिकांत गव्हाणे, स्वस्तिक नलावडे, ॲड. दिगंबर साळूंके यांच्या हस्ते करण्यात
आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाल गव्हाणे यांनी केले. या कार्यक्रमाला आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश निळ, राजेंद्र मोहोळकर, युवराज रोकडे, गणेश तळेकर, सरडे भाऊसाहेब, विष्णू चव्हाण, दत्तात्रय सरडे शेटफळचे माजी सरपंच मुरलीधर पोळ, केशव बोराडे, प्रकाश डोंगरे, महेश पोळ, दत्तात्रय शंकर प्रसाद सरडे, स्वास्तिक नलावडे, अनिकेत वीर, रणजीत गव्हाणे, स्वप्निल गोळे, धिरज सरडे, सत्यम रोकडे यांच्यासह या परिसरातील उपस्थित होते.