खचलेल्या डिकसळ पुलाची आमदार नारायण आबा पाटील यांचेकडून पाहणी
खचलेल्या डिकसळ पुलाची आमदार नारायण आबा पाटील यांचेकडून पाहणी
सोलापूर व पुणे जिल्ह्यास जोडणारा करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयावर अस्तीत्वात असलेला डिकसळ पुल खचल्याने दोन जिल्ह्यांमध्ये असलेला या भागातील संपर्क तुटला. उजनीच्या पातळीत वाढ झाल्याने हा पुल खचला गेला. यामुळे या भागात नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. आमदार नारायण आबा पाटील यांनी हे वृत्त समजताच तातडीने पुलाची प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुध्दा बरोबर घेतले. काही दिवसांपूर्वी आमदार नारायण आबा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचेकडे उजनी जलाशयावर बांधण्यात येणाऱ्या पुलांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा अशी मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात सुध्दा आमदार नारायण आबा पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला. एकतर डिकसळ पुल हा सर्वात जुना ब्रिटिश कालीन पुल आहे. यास पर्याय म्हणुन नवीन पुल मंजुर आहे. तसेच या जुन्या पुलाचे ऑडीट शासनाकडून केले गेले आहे. यामुळे सध्या तरी असलेले दळणवळणाचे एकमेव साधन म्हणुन डिकसळ पुल उरला होता. यामुळे आता या भागातील नागरिकांना दळणवळणाची सोय उरली नाही. यामुळे हा डिकसळ पुल तातडीने दुरुस्त केला जावा व नव्या पुलाचे काम युद्ध पातळीवर पुर्ण केले जावे ही नागरिकांनी मागणी केली. आमदार नारायण आबा पाटील यांनी कार्यतत्परता दाखवत तातडीने या पुलाची पाहणी केली व नागरिकांना धीर दिला. तसेच पुढील कामे तातडीने पुर्ण करण्याची सुचना अधिकाऱ्यांना दिली. या पाहणी वेळेस किरण कवडे, नवनाथ बापू, नागनाथ लकडे, ज्ञानेश्वर दोडमिसे सरपंच टाकळी, राजेश साळुंखे, आनासाहेब गलांडे, नीलकंठ शिंदे, रवी खांडेकर, डॉ. पाटील, दिलीप काका गलांडे, सुरेश कांबळे, उत्तम गलांडे, आनंद धांडे, किशोर खांडेकर, अमोल गलांडे ,चंद्रकांत पाडुळे, रणजित गलांडे, सचिन गोडगे, राजेंद्र गोडसे, रवींद्र मोरे, शेंडगे बापू आदि उपस्थित होते.