जेऊर ता.करमाळा येथे दिनांक 14 ऑगस्ट रोजी 300 फूट तिरंगा झेंडा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांमध्ये , विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती वाढावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जेऊर ता.करमाळा येथे दिनांक 14 ऑगस्ट रोजी 300 फूट तिरंगा झेंडा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांमध्ये , विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती वाढावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तिरंगा पदयात्रे मध्ये माजी सैनिक संघटनेचा सहभाग होता तसेच उपस्थित सर्व माजी सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमासाठी , माजी सैनिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात जेऊर बस स्टॉप पासून ते जेऊर बाजार तळापर्यंत केले गेले होते .
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जेऊर येथील सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी पुष्प वर्षाव करून या यात्रेचे स्वागत केले.