करमाळा तालुका .रावगाव, छत्रपतीनगर येथे पारंपारिक सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.
करमाळा तालुका .रावगाव, छत्रपतीनगर येथे पारंपारिक सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.
या सप्ताहात परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. सप्ताहाची सांगता रक्तदान शिबिराने झाली. यात बहुसंख्य तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
पारंपरिक पद्धतीने छत्रपतीनगर येथे हा सप्ताह आयोजित केला होता. यावर्षीही गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सप्ताहाचे नियोजन केले होते. सप्ताहाच्या सुरुवातीला आणि शेवटी गावामधून जंगी अशी मिरवणूक काढून सप्ताहाची सुरुवात व शेवट झाला.सप्ताहादरम्यान दररोज हरिपाठ, कीर्तन, सर्व लोकांसाठी भोजन, भोजन झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम, पहाटेच्या सुमारास गोड काकडा भजन असे कार्यक्रम झाले. यात नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन लाभले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सप्ताहाच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. गावातील अनेक युवकांनी यात सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि पाण्याचा जीआर देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सप्ताहाची सांगता समाजोपयोगी कार्यामुळे झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले..