निंभोरे येथे सरपंच रविंद्र वळेकर यांचा आदर्श उपक्रम - दहावीतील यशस्वी विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

निंभोरे येथे सरपंच रविंद्र वळेकर यांचा आदर्श उपक्रम - दहावीतील यशस्वी विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण
      

निंभोरे गावात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभोरे व श्री छत्रपती संभाजी विद्यालय  निंभोरे या शाळेतील विद्यार्थ्यांची सकाळी गावातून प्रभात फेरी निघाली.'जय जवान जय किसान', वंदे मातरम यासारख्या आदि घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
            निंभोरे गावातील सरपंच रविंद्र वळेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान स्वतः न घेता इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कु.दिव्या परमेश्वर मारकड हिच्या हस्ते ध्वजारोहण करून गावासाठी आदर्श व सन्माननीय असा आदर्श घालून दिला.त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये ध्वजारोहणासाठी मान मिळवण्याचा एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाचे गावकऱ्यांनी खूप मोठ्या अभिमानाने स्वागत केले.
       ध्वजारोहणानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करून पसायदानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत निंभोरे येथे राबविण्यात आला.
         महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण ग्रामपंचायत कडून करण्यात आले. हा पुरस्कार ज्या महिलांनी महिलांसाठी प्रोत्साहन पर काम केले आहे व महिलांचे विविध क्षेत्रातील मनोबळ वाढवण्याचे काम केले अशा महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे मानकरी निंभोरे गावातील सौ.सुनिता चंद्रकांत वळेकर (अंगणवाडी सेविका) व सौ.सुषमा रामा वाघमारे (सीआरपी उमेद अभियान) या दोन महिलांना देण्यात आला.सुनीता वळेकर यांनी लाडकी बहीण योजना व लेक लाडकी योजनेत गावातील महिलांसाठी भरीव काम केले आहे तर सुषमा वाघमारे यांनी बचत गटातील महिला सक्षम करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.त्यामुळे त्यांची सार्थ निवड करण्यात आली आहे.
       अशा प्रकारे खूप आनंददायी व उत्साही वातावरणात निंभोरे येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश