२३ ऑगस्ट रोजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या दिनांक २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम आयोजित केल्याची माहिती वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली. यामध्ये बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी चिखलठाण येथे ग्रामपंचायतच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या वतीने हे मोफत आरोग्य शिबीर घेतले जात आहे. या शिबीरामध्ये रक्तामधील साखरेची मोफत तपासणी करुन घरच्या घरी शुगर तपासणी करणारी डिजीटल मशीन डायबेटिक रुग्णांना वाटण्यात येणार आहे. तर दिनांक २१ रोजी कुर्डुवाडी येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कुर्डुवाडी येथील डॉ भारत पाटील फाऊंडेशन व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा होत आहे. सदर मेळावा गणेश हॉल वागळे हॉस्पिटल शेजारी) येथे होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या वतीने मुक बधीर विद्यालय करमाळा (श्री देवीचा माळ) येथील मुकबधीर विद्यार्थ्यांना स्नेह भोजन व रावगाव या करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व वनविभाग करमाळा यांच्या वतीने तालुक्यातील गायरान (फॉरेस्ट) मध्ये ५००० वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. तर दिनांक २३ ऑगस्ट रोजी जेऊर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच भव्य रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे. तर दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जेऊर येथे आमदार नारायण आबा पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवाय करमाळा मतदार संघात विविध ठिकाणी ग्रामस्तरावर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, खाऊ वाटप यासह अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संयोजन समितीने दिली. यावेळी सभापती अतुल भाऊ पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननावरे,
युवानेते पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक, आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ तालूकाध्यक्ष डॉ प्रा संजय चौधरी, बहुजन संघर्ष समिती अध्यक्ष व आदिनाथ संचालक राजाभाऊ कदम, संचालक रामेश्वर तळेकर, चिखलठाण सरपंच विकास गलांडे, माजी सरपंच राजुशेठ गादिया, जेऊर उपसरपंच नागेश झांजुर्णे, सदस्य संदिप कोठारी, सदस्य उमेश कांडेकर, संतोष वाघमोडे, माजी सरपंच किरण पाटील, आमदार नारायण आबा पाटील सोशल मीडिया तालूकाप्रमुख संजय फडतरे, राहुल गोडगे, सुर्यकांत पाटील, सुनील तळेकर आदि उपस्थित होते.