अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई द्या, आमदार नारायण आबा पाटील यांची कृषीमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे कडे मागणी
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई द्या, आमदार नारायण आबा पाटील यांची कृषीमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे कडे मागणी
करमाळा मतदार संघामध्ये सरासरी पेक्षा जास्त झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन बाधित क्षेत्राला नुकसान भरपाई देण्याबाबत एक निवेदन आमदार पाटील यांनी शासनाकडे तातडीने पाठवले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की करमाळा मतदार संघामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये सरासरीच्या ७८.९% अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीच्या झालेल्या पावसामुळे शेतातील कांदा, उडीद, मुग, तूर, मका,बाजरी,सोयाबिन, केळी व भाजीपाला वर्गीय उभ्या तसेच काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन बाधित झालेले आहे. करमाळा मतदारसंघातील अतिवृष्टीची नोंद दिनांक १४/०९/२०२५ रोजी मंडलनिहाय केम ७२.५% जेऊर ६७.८%, सालसे ६७.३%, कोर्टी ७६.८%, उमरड ६७.८% केत्तूर ७६.८%, कुर्डूवाडी ६५.३ %, रोपळे ८५.३ %, महिसगाव ६६.८ % येथे झालेली आहे. त्यामुळे उक्त मंडलातील गावामधील शेतकर्यांची काढणीस आलेली पिके अतिवृष्टीमुळे वाया गेलेली आहेत. त्यामुळे आता शासनाकडून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असुन यासाठी महसुल तसेच कृषी विभागाने योग्य ती कार्यवाही सुरु करावी अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली. तसेच मौजे वडाची वाडी ता. करमाळा येथील शांताबाई बाळू वाघ या महिलेच्या अंगावर दि.१३/०९/२०२५ रोजी वीज पडून ती मयत झालेली आहे. तर त्याच गावातील दुसरी महिलेच्या शरीरावर वीज पडल्याने ती गंभीर भाजलेली आहे. सदर महिलेच्या नातेवाईकास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून आर्थिक सहाय करण्यात यावी.
सर्व बाबींचा गंभीरतेने विचार करुन महसुल व कृषी विभागाने प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे तयार करावेत. या नुकसानभरपाई बाबतचा अहवाल तातडीने वरीष्ठ कार्यालयास पाठवावा तरच आगामी काळात पिक नुकसान भरपाईस शेतकरी पात्र ठरतील. शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली तरच त्यांचे पुढील पिकाचे उत्पादन घेता येईल. काल १४ सप्टेंबर रोजी रात्रभर करमाळा मतदार संघामध्ये सर्व दूर पाऊस होता. कोर्टीसह अनेक ठिकाणी ढग फुटीचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे वाड्या वस्त्या व गावास जोडणारे रस्ते वाहून गेलेले आहेत. सदर रस्ते त्वरित दुरुस्त करावेत. यासोबत महसुल व कृषी विभागाच्या वतीने करमाळा मतदार संघामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने झालेल्या पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी संबधित अधिकाऱ्यास योग्य ते निर्देश देऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशीही मागणी केली आहे. तर काल झालेल्या ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती, घरे, जनावरे, दळणवळण व्यवस्था याबाबत नागरिकांनी थेट महसुल विभागास माहिती द्यावी.तर याबाबत काही अडचणी आल्यास जेऊर येथील आमदार कार्यालयातही नुकसानीचे फोटो अथवा व्हीडिओ पाठवावेत असे आवाहन यावेळी पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले.