करमाळा येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदूंनी फक्त हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करावी असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत पोलिसांनी स्वतः संग्राम जगताप यांच्यावर धार्मिक भावना भडकवण्याचे कृत्य म्हणून करवाई करावी अशी मागणी ऍड. सविता शिंदे यांनी केली आहे.

ऍड. सविता शिंदे पुढे म्हणाल्या की, संग्राम जगतापांची वक्तव्ये चिथावणीखोर असून समाजात दुही व द्वेष निर्माण करणारी आहेत. समाजातील शांतता अशा वक्त्यामुळे भांग होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. संग्राम जगतापांच्या अशा वक्तव्यामुळे याआधी पुणे जिल्ह्यात विशिष्ठ समाजाला टार्गेट करून दंगल झालेली आहे.
येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पर्शवभूमीवर हिंदू व मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम सत्ताधारी पक्षांकडून होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकरी व सामान्य लोक संकटात आहेत. त्यांना मदत करण्याऐवजी हिंदू जनअक्रोश मोर्चा काढणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. संग्राम जगताप यांनी त्यापेक्षा पुरामुळे संकटात असलेल्या हिंदू शेतकऱ्यांना मदत करावी असा टोला ही ऍड. सविता शिंदे यांनी लगावला आहे.
भाजप व सत्तेतील त्यांचे मित्रपक्ष यांनी समाजात जाती धर्मांधतेचे मोठे विष पेरलेले आहे. त्यामुळेच म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत जातीय धर्मांध शक्तींची मजल गेली आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालणे ही पोलीस, प्रशासन तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही ऍड. सविता शिंदे यांनी केली आहे.