श्री मकाई कारखाना यावर्षी कामगारांची दिपावली गोड करणार...चेअरमन दिनेश भांडवलकर.

श्री मकाई कारखाना यावर्षी कामगारांची दिपावली गोड करणार...चेअरमन दिनेश भांडवलकर.          करमाळा          श्री मकाई सहकारी साखर कारखाना यावर्षी 

कामगारांची दिपावली गोड करणार असून गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कामावर हजर असणाऱ्या सर्व कामगारांना ८.३३ टक्के बोनस देणार असून सदरची रक्कम ही संबंधित कामगारांना दिपावली सणापूर्वी अदा केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिनेश अंबादास भांडवलकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक व जनरल मॅनेजर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना चेअरमन दिनेश भांडवलकर म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या मा. आमदार शामलताई बागल (मामी), आमच्या मार्गदर्शिका, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रश्मी  बागल, श्री मकाई कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार अत्यंत काटकसरीने व नियोजनबद्ध सुरू असून मकाई कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासद व कामगारांच्या हिताचा विचार केलेला आहे.
मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यासह कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अत्यल्प पावसामुळे व आर्थिक अडचणीमुळे कारखाना गळीत हंगाम २०२३-२४ व २०२४-२५ सुरू करू शकला नाही. परंतु आमच्या मार्गदर्शिका, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रश्मी  बागल यांच्या प्रयत्नामुळे आता कारखान्याची आर्थिक अडचण संपलेली असून यापुढील काळात कारखान्याची गाळप क्षमता विस्तारीकरण करून जास्तीत जास्त गाळप करून इतर कारखान्याच्या स्पर्धेत ऊस दर देण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा मानस असल्याचे मत चेअरमन यांनी यावेळी व्यक्त केले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश