करमाळा नगरपरिषद निवडणूक करमाळा शहर विकास पॅनल पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती मुख्य प्रवर्तक कुणाल ( भैय्या ) पाटील

करमाळा नगरपरिषद निवडणूक करमाळा शहर विकास पॅनल पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती मुख्य प्रवर्तक कुणाल ( भैय्या ) पाटील

 यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 
नुकतीच वीस सदस्यांची व नगराध्यक्ष पदाची घोषणा निवडणूक आयोगाकडून झालेले आहेत. प्रभाग पद्धती व आरक्षण निश्चिती जाहीर झालेली आहे तरी आम्ही सर्व जागेवर उमेदवार देऊन विजय संपादन करणार आहोत. 
लवकरच आम्ही जनतेच्या विकासाच्चा वचननामा जाहीर करणार आहोत.
 विकासाचा वचननामा आणि भ्रष्टाचार विरहित समाजसेवक (नगरसेवक) शहराच्या विकासाच्या अनुषंगाने काम करतील. आतापर्यंत शहरातील दोन्ही तिन्ही गटांनी केवळ विकासाच्या गप्पा मारल्या. मूलभूत सोयी सुविधा मिळण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.
 आम्हाला सत्ता दिल्यास ज्याप्रमाणे अकलूज ,बारामती शहरे पूर्णपणे विकसित शहरे झालेले आहेत त्याचप्रमाणे विकासाचे मॉडेल करमाळा शहर होणार आहे. कोणताही नगरसेवक एक रुपयाचा ही भ्रष्टाचार करणार नाही. 
जनतेच्या प्रश्नावरती प्रभागामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन विकास आराखडा तयार केला जाईल. 
शहरांमध्ये धुळीचे साम्राज्य, रस्त्याची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याचे ढिसाळ  नियोजन, रहदारी समस्या, स्वच्छता, उधान, टाऊन हॉल, फुटपाथ, हद्दवाढ भागामध्ये मूलभूत सुविधा या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यास भर राहणार आहे. 
नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक पदासाठी समविचारी पॅनल उमेदवार उभे करून जनतेसमोर जाणार आहोत असे माहिती कुणाल ( भैय्या )पाटील यांनी दिली

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश