स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: १० नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता ?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: १० नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता?
राज्यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.
आचारसंहितेबाबत मोठी बातमी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची दाट शक्यता असून, या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.