करमाळ्यात उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू :सुजित बागल

करमाळ्यात उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू :सुजित बागल 


 हंगाम सन २०२५ - २६ मध्ये एनसीसीएफ नाफेड मार्फत उडीद, मुग, सोयाबीन खरेदी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तर्फे करमाळा तालुक्यासाठी श्री विठ्ठल सर्वसाधारण सहकारी  संस्थेस  खरेदी केंद्र मंजूर झाले आहे .ज्या शेतकऱ्यांना या कडधान्याची विक्री करावयाची आहे अशा शेतकऱ्यांनी सन २०२५ - २६ ची पिकाची नोंदणी असलेला सातबारा उतारा ,आधार कार्ड ,बँक पासबुक , आठअ आदी कागदपत्रे घेऊन संस्थेच्या करमाळा मार्केट कमिटीच्या आवारातील डीसीसी बँकेचे शेजारील कार्यालयात आपली कागदपत्रे घेऊन नोंदणी करावीअसे आवाहन श्री विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्थेचे सचिव सुजित बागल यांनी केले आहे .अधिक माहितीसाठी संस्थेचे व्यवस्थापक श्री अजिनाथ मोरे मोबाईल नंबर ९४२१० २३२९६ वर संपर्क करावा असे आवाहन श्री बागल यांनी केले आहे .

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश