विहाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.पुजाताई मोहन मारकड या ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित.
विहाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.पुजाताई मोहन मारकड या ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित.
अखिल भारतीय सरपंच परिषद ,महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिला जाणारा मानाचा " महाराष्ट्राचा ग्रामरत्न सरपंच " हा पुरस्कार सौ.मारकड यांना नुकताच लोणावळा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला ,२०१६ पासून गावामध्ये त्यांनी गावात राबविलेल्या विविध योजना ,लोकसहभागातून केलेली कामे,महिला सशक्तीकरण,जलसंधारण ची कामे,एन.जी.ओ. च्या माध्यमातून केलेली कामे या सर्व कार्याची दखल घेऊन सरपंच परिषदेने त्यांचा हा गौरव करण्यात आला.सर्व ग्रामस्थाकडून व सामाजिक संस्थांकडून त्यांचे पुरस्काराबद्दल कौतुक होत आहे.