वीट जिल्हा परिषद गटात विकासकामांचा धडाका(गणेश चिवटे यांच्या प्रयत्नांनी गावोगावी प्रगतीचा वेग वाढला)
वीट जिल्हा परिषद गटात विकासकामांचा धडाका
गणेश चिवटे यांच्या प्रयत्नांनी गावोगावी प्रगतीचा वेग वाढला
करमाळा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा नियोजन समितीचे कार्यतत्पर सदस्य गणेशभाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा अक्षरशः धडाका सुरू आहे.गेल्या काही महिन्यांपासून गटातील अनेक गावांमध्ये रस्ते, शाळा दुरुस्ती, सिमेंट काँक्रीट रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, अंगणवाडी बांधकामे, आणि ग्रामसुधारणा प्रकल्पांची मालिका सुरू असून यामुळे परिसरातील जनतेमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.अलीकडेच वाशिंबे व शेलगाव (क) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या गावांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते, शाळा दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या सोयी आणि ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.तर अर्जुननगर व मिरगव्हाण येथे नुकतेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. नव्या रस्त्यांची निर्मिती, वीज वितरण यंत्रणा सुधारणा, तसेच ग्रामपातळीवरील सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.या सर्व कार्यक्रमांना ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे आणि स्थानिक सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी गणेशभाऊंचे स्वागत करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गणेशभाऊ चिवटे म्हणाले,हा विकासनिधी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने हि कामे मंजूर करण्यात आली असे प्रतिपादन गणेश चिवटे यांनी केले
त्यांनी पुढे सांगितले की, जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेल्या योजनांपैकी मोठा वाटा करमाळा तालुक्यास मिळवून देण्यात आला असून त्याचा थेट फायदा ग्रामस्थांना होत आहे.या सर्व कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून येत आहे.गावा गावात विकासाचे काम सुरू झाल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी महिला वर्गाने आणि युवकांनी गणेशभाऊंचे स्वागत फुलहार आणि घोषणाबाजीने केले.
गावकऱ्यांनी सांगितले की, “इतक्या अल्प कालावधीत एवढ्या प्रमाणात कामे सुरू झालेली आम्ही प्रथमच पाहत आहोत. गणेशभाऊंच्या प्रयत्नांमुळे आमच्या गावात खऱ्या अर्थाने विकास घडतो आहे.गाव पातळीवर सुरू असलेल्या या प्रगतीच्या लाटेमुळे वीट गटात ‘विकास हीच ओळख’ असा ठसा उमटला आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रांमध्ये होत असलेली कामे पाहता गणेशभाऊ चिवटे हे “विकासाचे प्रतीक” म्हणून लोकमानसात स्थान मिळवत आहेत.
त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील अनेक विकास आराखडे गतीमान झाले असून शेतकरी, महिला आणि युवकवर्गासाठी उपयुक्त सुविधा निर्माण होत आहेत.अशी जनामानसात चर्चा आहे.