गणेश भानवसे यांच्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल, मंत्री अतुल सावे यांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश.....

गणेश भानवसे यांच्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल, मंत्री अतुल सावे यांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश.....
       
      वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रताप पवार हे सध्या जिल्हा व्यवस्थापक असून त्यांच्याकडे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. परंतु ते या पदास पात्र नाहीत. व त्या पदावर राहून त्यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असे गणेश भानवसे यांनी वारंवार संबंधित मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना तक्रार केली होती. 
  तसेच काही दिवसापूर्वी त्यांनी आझाद मैदान येथे पाच दिवसाचे आमरण उपोषण केले होते. परंतु त्यानंतर त्यांना लेखी आश्वासन देऊन उपोषणापासून परावृत्त केले होते. परंतु त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. 
   त्यामुळे गणेश भानवसे हे दिनांक 10 डिसेंबर 2025 पासून संविधान चौक नागपूर या ठिकाणी उपोषण करणार होते. 
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाचे मंत्री श्री अतुलजी सावे साहेब यांनी गणेश भानवसे यांच्याशी संपर्क साधून चर्चेला बोलावले. चर्चेदरम्यान त्यांनी संबंधित विभागाचे सचिव यांना श्री प्रताप पवार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गणेश भानवसे यांचे संविधान चौक नागपूर येथील उपोषण त्यांनी तूर्तास स्थगित केले आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश