तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव, आमदार नारायण आबा पाटील यांनी केली विधानसभा सभापती यांचेकडे मागणी



तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव, आमदार नारायण आबा पाटील यांनी केली विधानसभा सभापती यांचेकडे मागणी

महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे चालू असुन करमाळा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबीत प्रश्न सोडवण्यासाठी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी तारांकीत प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा तास चर्चा आदि विधीमंडळ कामकाजात आमदारांना दिलेल्या अधिकाराचा वापर केला आहे. अशातच मतदार संघातील प्रशासनाबाबतही आमदार नारायण आबा पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. याचाच एक भाग म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या विरोधात आता हक्कभंग प्रस्ताव आणवा व कसुन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी विशेषाधिकार समितीत केली असुन समिती अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कडे रितसर हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. या समितीचे स्वतः आमदार नारायण आबा पाटील हे सदस्य आहेत. या विशेषाधिकार समितीकडुन हक्कभंग प्रस्ताव सभापती महोदयांना सादर केला जातो.आमदार पाटील यांनी विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांचेकडे सुध्दा लेखी तक्रार दिली आहे आहे. वास्तविक पाहता आमदार नारायण आबा पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी आमसभा घेतली होती. त्यावेळी अनेक विभागात चालू असलेला भ्रष्टाचार व कामचुकारपणा या विरोधात अनेक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. सदर आमसभेत आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रशासन यापुढे अधिक गतिमान झाले पाहिजे. तसेच नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक देऊन त्याच्या प्रश्नाची सोडवणुक केली जावी अशी सुचनाही त्यांनी जवळपास सर्वच विभागप्रमुखांना दिली होती. परंतु तरीही शासकीय अधिकारी हे कामचुकारपणा करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता आमदार नारायण आबा पाटील यांनी जनतेच्या हितासाठी कडक पाऊल उचलले असुन तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी त्यांनी चालू अधिवेशनात मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून महसुल विभागातील कर्मचारी खुलेआम भ्रष्टाचार करत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडे नागरिकांनी दिल्या होत्या. तसेच शेतीच्या वादाचे निवारण करुन निकाल देण्यास होत असलेली दिरंगाई, प्रलंबीत असलेली अनेक प्रकरणे, अतिवृष्टी मधील नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले गेलेले कमीशन‌ यासह अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने शेवटी आमदार नारायण आबा पाटील यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार पाटील यांचेकडून आमसभेत सर्वच अधिकाऱ्यांना कामात कुचराई केली तर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाईल असे संकेत दिले होते. पण तरीही परिस्थिती बदलत नसल्याने व जनतेच्या प्रश्नांची हेळसांड होत असल्याने हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे. करमाळा मतदार संघातील इतरही काही अधिकारी कामात हलगर्जीपणा तसेच भ्रष्टाचार करत असल्याच्याही तक्रारी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडे नागरिकांनी दिल्या असल्याचे समजते. यामुळे आता आणखी कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार हे लवकरच समजणार आहे. प्रशासनात मात्र आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चांगलीच खळबळ उडाली असुन जनतेत यात्र आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतलेल्या भुमिकेस समर्थन मिळत आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश