करमाळा नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना: लाखो लिटर पाण्याची नासाडी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

करमाळा नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना: लाखो लिटर पाण्याची नासाडी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण



करमाळा, (प्रतिनिधी):
करमाळा शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारी नगरपालिकेची महत्वाकांक्षी योजना सध्या प्रशासनाच्या अनास्थेमुळे वाटेतच खिळखिळी झाली आहे. जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी दररोज वाया जात असून, एकीकडे शहरवासी टंचाईच्या झळा सोसत असताना दुसरीकडे पाण्याचा हा अपव्यय प्रशासकीय दुर्लक्षाचे स्पष्ट चित्र दाखवत आहे.

नगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. मुख्य वितरण केंद्रातून शहराकडे येणाऱ्या पाईपलाईनमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या 'गळतीतून दररोज अंदाजे लाखो लिटर शुद्ध पाणी थेट  रस्त्यावर वाहत आहे. हे वाया जाणारे पाणी इतके आहे की, जर ही गळती थांबवली, तर शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

करमाळा नगरपालिकेत सध्या प्रशासक राजवट आहे. शहराच्या मूलभूत गरजांकडे प्रशासकांनी अधिक लक्ष देणे अपेक्षित असताना, पाणीपुरवठा योजनेतील या गंभीर त्रुटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाईपलाईन दुरुस्तीचे काम तात्पुरत्या स्वरूपात केले जाते किंवा पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश