अडीच कोटी मंजूर; विकासकामांसाठी २ कोटी रुपये तातडीने वर्ग.आमदार नारायण आबा पाटील
करमाळा उप जिल्हा रुग्णालयातील शंभर खाटांच्या मान्यतेनंतर इमारत बांधकाम करण्यासाठी.
आणखी अडीच कोटी रुपये मंजुर झाले असुन दोन कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील
यांनी दिली आहे. सध्या नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असुन आमदार नारायण आबा पाटील यांचे कडुन करमाळा मतदार संघातील प्रलंबीत कामांचा पाठपुरावा सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्याची विनंती केल्यावर आज हा अडीच कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटांची मागणी आपण या पुर्वीच्या माझ्याच टर्म मध्ये केली होती व त्यास मंजुरी मिळवण्यात आपल्याला यश आले होते. आता सध्या आपण नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासह अनेक महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा सुरु ठेवला असुन यातील उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करणेसाठी आणखी दोन कोटी बावन्न लाख एकतीस रुपयांची मंजुरी मिळवली आहे. यातील दोन कोटी रुपये तातडीने संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येत आहेत. यामुळे उपजिल्हा रुग्णालय सक्षमीकरण करण्यास आणखी हातभार लागणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. करमाळा उपजिल्हा रुग्णालय हे करमाळा तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचे रुग्णालय असुन या ठिकाणी करमाळा शहरासह जवळपास पन्नास हुन अधिक गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. येथील रुग्णालयात आणखी अद्यावत सुधारणा करण्यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे. तसेच येथील डॉक्टर तथा कर्मचाऱ्यांची रिक्त पदे व अद्यावत उपचार मशीन उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.