आमदार नारायण आबा पाटील यांची विधानसभा विशेषाधिकार समितीत वर्णी, पहिली बैठक संपन्न
आमदार नारायण आबा पाटील यांची विधानसभा विशेषाधिकार समितीत वर्णी, पहिली बैठक संपन्न
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा विशेषाधिकार समितीत सदस्य म्हणुन निवड झाल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिली. याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की विशेषाधिकार समिती हि एक अतिशय महत्वाची समिती असुन यात आमदारांच्या हक्क व विधीमंडळ कामकाजाबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातात. विशेषतः विधानमंडळ सदस्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास अथवा अवमानकारक वागणूक, शासकीय कार्यक्रमात योग्य सन्मान न मिळणे अशा घटनांची चौकशी करणे व चौकशीअंती दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाई आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणे आदिसह हक्कभंग प्रस्ताव सभापती महोदयांना सादर करणे आदि बाबत निर्णय घेतले जातात. या महत्वाच्या समितीत आमदार नारायण आबा पाटील यांची निवड झाली आहे. या समितीत एकुण पंधरा सदस्य आहेत.नागपुर येथे काल मंगळवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२५, दुपारी ०३.०० वाजता आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा विशेषाधिकार समितीची बैठक विधानभवन, नागपूर येथील विधानसभा कामकाज सल्लागार समिती कक्ष (कक्ष क्र. ३, तळ मजला) येथे पार पडली. या बैठकीस सर्व सन्माननीय सदस्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.