भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या प्रयत्नामुळे करमाळा तालुक्यातील १६ पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली,

भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या प्रयत्नामुळे करमाळा तालुक्यातील १६ पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली,  

करमाळा - भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांची गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाली व चिवटे यांनी पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मातोश्री ग्रामसमृद्धी शेत  पाणंद रस्ते बंद असले बाबत  आवाज उठवला होता, 
यानंतर तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात या विषयावर बैठक संपन्न झाली,
 व लवकरच या रस्त्यांची कामे सुरू होतील असे तहसीलदार माने यांनी सांगितले आहे, या बैठकीसाठी तहसीलदार समीर माने ,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता डी.पी गौडरे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एम. उबाळे ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते 


प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे  करमाळा

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश