आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दशरथ अण्णा कांबळे यांची भूमिका काय असणार तालुक्यामध्ये चर्चेला उधानकरमाळा (प्रतिनिधी) हर्षवर्धन गाडे

आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दशरथ अण्णा कांबळे यांची भूमिका काय असणार तालुक्यामध्ये चर्चेला उधान

करमाळा (प्रतिनिधी) हर्षवर्धन गाडे

करमाळा तालुक्यामध्ये सध्या आदिनाथ कारखान्यावरून सुरू असलेल्या राजकारण कारण की बऱ्याच दिवस कारखाना बंद होता आणि आता आदिनाथ कारखाना चालू झाला असल्यामुळे आता प्रत्येकाचे राजकीय डोळे विसपारले आहेत यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कामगार संघर्ष समिती दशरथ अण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यापासून आदिनाथ कारखान्यातील कामगारांसाठी लढत

आली आहे   दशरथ अण्णा यांच्या नेतृत्वाखाली करमाळा बंद तिरडी मोर्चा रास्ता रोको साखर आयुक्त आंदोलन उपोषण करण्यात आले बरोबर घेऊन सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख वैशाली सातपुते यांच्याबरोबर करून कामगारांना साखरे मधून तीन कोटी 77 लाख रुपये जमा हे त्यांच्या आंदोलनाचा कामगारांना कामावर परत घेतले त्या संघटनेची अद्यापि भूमिका स्पष्ट झालेली नाही व येणाऱ्या काळामध्ये आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दशरथ अण्णा कांबळे हे कोणाच्या बाजूने व कोणाच्या गटातून निवडणूक लढवतील याचीही करमाळा तालुक्यामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे तर ज्या प्रकारे माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सुद्धा सांगितले आहे की आदिनाथ कारखाना हा करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार

संजयमामा शिंदे यांच्याकडे द्या आम्ही चांगल्या प्रकारे चालवून दाखवू याचाच अर्थ असा आहे की शिंदे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर बारामती ॲग्रो चे रोहित दादा पवार यांनी सुद्धा आदिनाथ कारखान्या विषयी भाष्य केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुनील तळेकर यांनी सुद्धा सांगितले आहे की आदिनाथ कारखान्याच्या निवडणुका आहेत ह्या पाटील गट जिंकणार आहे अशा प्रकारे भाष्य केले असल्यामुळे बागल गट सुद्धा पाटील गट सुद्धा येणाऱ्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकतीनुसार उतरणार आहे हे आता चित्र स्पष्ट होऊ लागले आहे तर एकीकडे हरिदास डांगे हे आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून सध्या गावागावांमध्ये भेटी घेऊन आदिनाथ कारखाना हा बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत तर जे काय सभासद राजकीय नेते मंडळी आहेत त्यांनी अद्याप त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे तर दशरथ आण्णा कांबळे हे सुद्धा कारखान्याच्या कामगाराविषयी प्रत्येक वेळेस सक्रिय होते तर त्यांची सुद्धा आद्यपीपर्यंत भूमिका स्पष्ट झालेली नाही त्यामुळे तालुक्यामध्ये आदिनाथ च्या बाबतीत दशरथ आण्णा कांबळे यांची काय भूमिका असेल या विषयी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश