मणिपूर सरकारच्या आणि संभाजी भिडे च्या विरोधात शुक्रवारी बहुजन संघर्ष सेना करणार तहसील कचेरी समोर निदर्शने
मणिपूर सरकारच्या आणि संभाजी भिडे च्या विरोधात शुक्रवारी बहुजन संघर्ष सेना करणार तहसील कचेरी समोर निदर्शने
करमाळा प्रतिनिधी : हर्षवर्धन गाडे मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरलेले बिरेन सिंह सरकार बरखास्त करा व राष्ट्रपती राजवट लागू करा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूर येथील हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरल्याने अमित शहा यांचा राजीनामा घ्या .
भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल व महात्मा गांधी, महात्मा फुले, इतर महामानवाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने देशद्रोही मनोहर उर्फ संभाजी भिडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेना करमाळा तहसील कचेरी समोर 4 ऑगस्ट शुक्रवार रोजी ठीक ११:०० वाजता बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करणार आहे याची माहिती बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा सचिव आप्पा भोसले यांनी दिली आहे लोकशाही व संविधानावर्ति प्रेम करणाऱ्या सर्व नागरिक कार्यकर्त्यांनी उपस्तित राहवे असे आवाहन अपा भोसले यांनी केले आहे .
निदर्शने करणार असल्याचे पत्र तहसीलदार विजय कुमार जाधव साहेब यांना देताना राजाभाऊ कदम ,अपा भोसले ,हनुमंत खरात,संतोष चव्हान,मच्छिन्द्र काळे ,खाडे सर आदी उपस्तित होते