उमरडचे प्रा.नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार प्रदान

उमरडचे प्रा.नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार प्रदान



सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व निवेदन क्षेत्रातील कार्याबद्दल उमरड ता. करमाळा येथील  श्री. नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण साडे निलंगे मळा येथे शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या आठव्या पुण्यस्मरणाबद्दल करण्यात आले यावेळी आमदार नारायण आबा पाटील कर्नल यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र असे होते. भारतीय सेनेतील शहिद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्याची दखल घेत.  शहिद मेजर अमोल निलंगे स्मारक समिती समाजभूषण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण शहिद मेजर अमोल निलंगे स्मारक समिती, साडे व यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

उमरड येथील ओढ्यावर पूल बांधण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी सिमेंटच्या नळ्या उमरड येथील ओढ्यावर पोहोच केल्या ग्रामस्थांमध्ये आनंद

कुगाव बोट दुर्घटना ....प्रशासनाशी समन्वय ठेवून आहे...आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा तालुक्यातील आ.संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...